कांदाचाळ अनुदान ; कांदाचाळी साठी मिळतय अनुदान पहा संपूर्ण माहिती…
कांदाचाळ अनुदान ; कांदा साठवणूक करण्यासाठी सुसज्ज कांदाचाळ नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब होत असतो. कांद्याची टिकवण क्षमता वाढवी आणि क्वालिटी चांगली राहावी म्हणुन राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदा चाळीसाठी अनुदान दिले जाते. कांदाचाळ योजनेचा लाभ कसा घ्यावा तसेच यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात अटी/शर्ती काय आहेत आणि अर्ज कुठे करावा याबाबत संपूर्ण माहिती पाहुया.
कांदाचाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत.
1) शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असने आवश्यक आहे आणि 7/12 वर कांदा पिकांची नोंद असने आवश्यक आहे.
2) शेतकऱ्यांकडे कांदा पिक असने सुद्धा आवश्यक आहे.
3) कांदाचाळ योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ यांना घेता येतो.
कांदाचाळी साठी ऑनलाईन अर्ज करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे खालील प्रमाणे
7/12 उतारा, 8 अ, आधार कार्ड, बँक पासबुक, जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी) , यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबत शेतकऱ्यांचे हमीपत्र.
कांदाचाळ योजनेसाठी अर्ज कसा करावा.
कांदाचाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज करावा. शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्जाची नोंदणी केल्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक असते.