कांदाचाळ योजना ; रोजगार हमी योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना कांदाचाळ मिळणार नाही…

कांदाचाळ योजना ; रोजगार हमी योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना कांदाचाळ मिळणार नाही…

कांदाचाळ योजना ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाची योजना म्हणजे कांदाचाळ योजना यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, सामुदायिक शेतकरी , स्वयंसहायता बचत गट किंवा शेतकऱ्यांचे गट या योजनेच्या लाभासाठी पात्र करण्यात आले होते. परंतु दि. 09/जुलै/2024 रोजी या योजनेत बदल करण्यात आले असून त्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य सरकारने दि. 18/मे/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना सुद्धा कांदाचाळ योजनेच्या लाभ घेण्यासाठी मंजुरी दिली होती. परंतु दि. 09/जूलै रोजी यामध्ये सुधारणा करून योजनेत बदल केले आहेत.

दि. 09/जुलै च्या सुधारित शासन निर्णयानुसार आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेत फक्त सामुदायिक शेतकरी, स्वयंसहायता बचत गट किंवा शेतकऱ्यांचे गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सदर योजनेत झालेल्या बदलानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ योजनेचा लाभ घेता येणार नाही. सदर योजनेत केलेल्या बदलाचा सुधारित शासन निर्णय पहा..

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदाचाळ योजनेत केलेला बदलाचा शासन निर्णय येथे पहा…

Leave a Comment

Close Visit agromedia24