गारपीटीचा इशारा – राज्यातील या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज…

गारपीटीचा इशारा – राज्यातील या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज…

गारपीटीचा इशारा – हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात गारपीट तर उर्वरित महाराष्ट्रात वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा अंदाज पुढचे पाच दिवस कायम आहे. हवामान खात्याने आज दिलेले इशारे खालील प्रमाणे आहेत….

आज तीन एप्रिल रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात सुद्धा वादळी वारे आणि पावसाचा अंदाज आहे. विदर्भात तीव्र हवामान व 40-50 किमी वारे व अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. (IMD)

आज हवामान विभागाने ठाणे पालघर वगळता संपूर्ण कोकणात यलो अलर्ट जारी केला असून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे आणि मराठवाड्यातील संभाजीनगर आणि जालना सोडता सर्व जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यात गारपीटीसह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वादळी पावसाचे सावट आणखी पाच दिवस कायम राहिल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

 

 

Leave a Comment

Close Visit agromedia24