गारपीट अलर्ट : राज्यातील या दोन जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज हवामान विभाग
गारपिट अलर्ट : हवामान विभागाने विदर्भातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. यवमाळ, अमरावती जिल्ह्यातही दोन दिवस आणि अकोला जिल्ह्यात एक दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.
मराठवाड्यात तापमानात वाढ झाली असून काही ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात दुपारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज तर सायंकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही उन्हाचा पारा कायम राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.