नमो शेतकरी योजना : खूशखबर नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय आला

नमो शेतकरी योजना : खूशखबर नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय आला

नमो शेतकरी योजना : गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखेर दि. 26/मार्च रोजी सहाव्या हप्त्याच्या लाभासह मागील प्रलंबित निधी वाटप करण्याबाबतचा सरकारी निर्णय (Government GR) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच सहाव्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

(Pm kisan yojna) पिएम किसान योजनेच्या 19/व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळत होता. मात्र, मागील हप्त्यादरम्यान, फक्त पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला होता. त्या दिवसांपासून शेतकरी नमोचा हप्ता कधी येणार असे विचारत होते. अखेर, आज दि. 26/मार्च रोजी यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर शासन निर्णय येथे पहा..

शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्यासाठी आणि मागील हप्त्यांच्या प्रलंबीत निधी साठी लाभार्थ्यांना 1642.18 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सविस्तर शासन निर्णय येथे पहा..

नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याबद्दल निधी वितरण करण्यात आले आहे. येत्या दोन तीन दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येईल अशी शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जाहीर करतील.

 

Leave a Comment

Close Visit agromedia24