नमो शेतकरी योजनेचा हप्ता का मिळाला नाही, समोर आले कारण…

नमो शेतकरी योजनेचा हप्ता का मिळाला नाही, समोर आले कारण…

नमो शेतकरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 व्या हप्त्याचे वितरण 29/मार्च पासून सुरू होईल आणि राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना थेट DBT द्वारे आधार संलग्न खात्यात हि रक्कम जमा केली जाईल. मात्र आज 02/एप्रिल आहे आणि अद्यापही शेतकऱ्यांना नमो च्या हप्त्याचे वितरण झाले नाही.

नमो शेतकरी योजनेचे थकित हप्ते अनेक शेतकऱ्यांना मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांना थकित हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. आणि येत्या दोन दिवसांत नमो शेतकरी योजनेचा 6-वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना आणखी एक दोन दिवस नमो च्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नमो शेतकरीचा हप्ता अजून का आला नाही…

सध्या शेतकरी ऑनलाईन पद्धतीने DBT ट्रॅकरवर किंवा PFMS वर तपासणी करताना त्यांचे हप्ता वितरण रिजेक्ट म्हणून दिसत आहे. आणि रिजेक्ट होण्याचे कारण DBFL (Deposit Bank Failure) असे दाखवले जात आहे. म्हणजेच बँकेकडून ट्रांजेक्शन पूर्ण झाले नाही. बँकेकडून डिपॉझिट लिमिट अडचणीमुळे ट्रांजेक्शन फेल झाले. मार्चएंड मुळे बँकेला क्लिअरिंग प्रोसेस अवघड जात होती त्यामुळे ट्रांजेक्शन फेल झाले.

सर्व एफटीओ (FTO) क्लिअर झाले होते आणि बँकेकडे ट्रांजेक्शन वितरित करण्यात आले होते, परंतु बँकांसमोर ट्रांजेक्शन फेल झाले यामुळे, एक-दोन दिवसात पुन्हा FTO जनरेट केले जाईल आणि हप्ता वितरित केला जाईल. जर हे FTO रिजेक्ट झाले नसते तर 30, 31/मार्चपर्यंत हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला असता.

 

 

Leave a Comment

Close Visit agromedia24