निराधार योजना ; योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी खुशखबर, पहा सविस्तर

्राधार योजना ; योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी खुशखबर, पहा सविस्तर

राज्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने जूनसह जुलै महिन्याचे मानधन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात 16 जून 2025 रोजी एक महत्त्वाचा जीआर (सरकारी निर्णय) जारी करण्यात आला आहे.

डिसेंबर 2024 पासून, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना DBT द्वारे मानधन दिले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मानधन वितरणात विलंब होत होता, परंतु आता जून 2025 चे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आसुन जुलै महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी 750 कोटी रुपयांचा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रलाइज्ड अकाउंटमध्ये जमा करण्यास मंजुरी मिळाली आहे.

निराधार योजना ; समाविष्ट असलेल्या सर्व योजना👇

◆संजय गांधी निराधार योजना
◆श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
◆केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना
◆इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
◆इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना

या निर्णयामुळे लाभार्थ्यांना वेळेवर मानधन मिळण्यास मदत होईल. हा जीआर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर maharashtra.gov.in उपलब्ध आहे.

Leave a Comment

Close Visit agromedia24