पंजाबराव डख ; पंजाब डख म्हणतात या भागात गारपीट होणार…
पंजाबराव डख ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दि. 23/मार्च रोजी नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. डख यांनी या अंदाजात शेतकऱ्यांना पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार 30/मार्चपासून म्हणजेच गुढीपाडव्याला राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. 31/मार्च ते 04/एप्रिल यादरम्यान राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पावसाची शक्यता आहे. 30/मार्चपासुन राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असुन संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बिघडणार आहे तरी शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार पुढील नियोजन करावे.
पंजाबराव डख यांनी विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
30/मार्चपासुन राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने गहू हरभरा तसेच इतर काही काढणीला आलेल्या पिकांची काढणी पुर्ण करावी असे डख यांनी सांगितले आहे. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा…