पंजाब डख ; या तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज, पाऊस कधी उघडनार ?
पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार १५, १६, १७, १८ जून रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये दररोज सरीवर सरी येणार आहेत. राज्यात दररोज वेगवेगळ्या भागांत पाऊस चालू राहणार आहे.पाऊस एकदम थांबणार नाही, पेरणी केलेल्या बियाणांची उगवण होईल अशी ओल जमीनीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या असा सल्ला पंजाबरावांनी दिलाय…
पंजाब डख ; या भागात पाऊस
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा या सर्व भागांमध्ये भाग बदलत 20 जूनपर्यंत दररोज पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
ज्यांच्या जमिनीमध्ये ओलावा (एक फुटापर्यंत) आहे, त्यांनी पेरणीची तयारी करावी, पेरणी करताना शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा. पुरेसा ओलावा आसेल तर पेरणी करायला हरकत नाही कारण पाऊस येनार च आहे.
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार १५ जूनपासून पडणाऱ्या पावसात विजांचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांनी विजेपासून स्वतःचे संरक्षण करावे. विजा चमकत असताना झाडाखाली (आंबा, लिंब, नारळ) किंवा पाण्याच्या टाकीखाली थांबू नका.मोबाईल टॉवर किंवा लोखंडी खांबाला हात लावून उभे राहू नका . विजा कडकडू लागल्यास मजुरांना घरी पाठवावे आणि स्वतःचा जीव वाचवावा .
अलीकडेच दासाळा येथे एका मुलीचा वीज पडून मृत्यू झाल्याचे उदाहरण दिले आहे, म्हणून झाडाखाली न थांबण्याचे आवाहन पंजाबरावांनी केले आहे.