पिएम किसान च्या नावाने आलेल्या लिंक वर क्लिक करु नका ; आर्थिक फसवणुकीचा धोका…

पिएम किसान च्या नावाने आलेल्या लिंक वर क्लिक करु नका ; आर्थिक फसवणुकीचा धोका…

पिएम किसान ; सध्या whatsaap वर अनोळखी नंबर वरून पिएम किसान चे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मेसेज येत आहेत. परंतु हे ॲप्लिकेशन फसवे असुन अशा अनोळखी नंबर वरुन आलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका त्यामधुन आर्थिक फसवणुकीचा धोका आहे.

आपल्या मोबाईल मध्ये बॅंकिंग ॲप्लिकेशन, ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन असते त्याचा ॲक्सेस घेऊन आर्थिक फसवणुक केली जात आहे. सध्या हे मेसेज येणे वाढले आहे तरी अशा अनोळखी नंबर वरून आलेल्या नंबर वरून कोणत्याही प्रकारची लिंक उघडू नका.

 

जर तुमची आर्थिक फसवणुक झाल्यास 1930 या टोल फ्री नंबर वरून तुम्ही तातडीने कॉल करुन माहिती द्यावी. सुरुवातीच्या दोन तीन तासांत जर वरील नंबर वर कॉल केला तर खात्यातून गेलेली रक्कम थांबवता येते तसेच परत मिळवता येते. तसेच असे काही प्रकार झाल्यास बॅंकेत किंवा पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार करावी.

सध्या अनेक लोकांची फसवणुक करून खात्यातील रक्कम कट केल्याचे प्रकार दिसून येत आहे. तरी सावधान रहा आणि अनोळखी नंबर वरून आलेल्या ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नका. हि माहिती आपल्या गावातल्या ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद…

Leave a Comment