पिएम किसान योजना ; नवीन नोंदणी करा, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप…
पिएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने मार्च/2019 मध्ये केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यात मिळुन 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत पिएम किसान योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांना वाटप केले आहे. पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता बिहार मधुन वितरित केला आहे.
शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करायची असल्यास ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन पद्धतींचा वापर करता येतो. पिएम किसानच्या लाभासाठी पात्र असलेल्या पण आतापर्यंत नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना येणाऱ्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळू शकतात.
शेतकऱ्यांकडे शेती करण्यायोग्य जमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे नाव राज्य आणि केंद्र सरकारच्या कागदपत्रांमध्ये असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर संलग्न असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी 2019/ पुर्वी शेती नावावर असने बंधनकारक आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस…
1) सर्वप्रथम योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
2) नवीन शेतकरी नोंदणी (New Farmer Registration) वर क्लिक करा.
3) आता तुम्ही तुमचा आधार क्रमांक नोंदवा.
4) तुम्हाला 10 अंकी मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल.
5) आता तुम्ही राज्याची निवड करा.
6) स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्चा क्रमांक नोंदवा, मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी क्रमांक नोंदवा.
7) आधार कार्ड, बँक पासबूक, जमिनीशी संबंधित कागदपत्रं अपलोड करा.
8) सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा, अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
अशा प्रकारे तुम्ही पिएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता. तुम्ही पात्र अद्याप असुनही अद्याप अर्ज केलेला नसेल तर लवकर योजनेत सहभागी होऊन वार्षिक 6000 रुपयांचा लाभ मिळवा. हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा… धन्यवाद.