पिकविमा योजना : एक रुपया ऐवजी सुटसुटीत पिकविमा योजना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे…
पिकविमा योजना : प्रधानमंत्री पिकविमा योजना राज सरकारकडून एक रुपयांत राबवली जात आहे. फक्त एक रुपया विमा भरणा असल्याने या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. शासकीय जमीनीवर तसेच गायरान जमीनीवर सिएससी चालकाने पिकविमा नोंदणी केली. हिवाळी अधिवेशनात पिकविमा योजनेत बदल करून भ्रष्टाचार थांबवावे अशी मागणी केलेली आहे.
पिकविमा योजनेत बदल करून एका अर्जासाठी 100 रुपये आकारण्यात यावेत अशीही मागणी नेमलेल्या समितीने केली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पिकविमा न मिळाल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. 31/मार्च पर्यंत पिकविमा मिळेल असे आश्वासन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत बदल केला जाईल असे कोकाटे यांनी सांगितले आहे. आता एक रुपयांत पिकविमा ऐवजी सुटसुटीत पिकविमा योजना राबवली जाईल असे कोकाटे यांनी सांगितले आहे. पिकविमा योजनेचा अभ्यास करून अद्ययावत आणि सुटसुटीत पिकविमा योजना राबवण्यात येईल असेही कोकाटे यांनी सांगितले आहे.