पिकविमा 2024 ; या जिल्ह्याला 02 लाख 60 हजार कोटींचा पिकविमा मिळणार…

पिकविमा 2024 ; या जिल्ह्याला 02 लाख 60 हजार कोटींचा पिकविमा मिळणार…

पिकविमा 2024 ; खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसान भरपाई आणि पिकविम्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे क्लेम केले होते. क्लेम केलेल्या पैकी 05 लाख 32 हजार शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीने मंजूर केले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख 32 हजार शेतकऱ्यांना 260 कोटींचा पिकविमा मिळणार आहे. आमदार रणजित सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तुम्हाला पिकविमा मिळणार का चेक करा

तुम्ही पिकविमा भरला असेल तर तुमच्या पिकविम्याचे स्टेटस चेक करू शकता. पिकविमा भरल्यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर विमा कंपनीकडून विम्याचे अर्ज तपासले जातात. अर्ज व्हेरीफाय केले जातात. यामध्ये बऱ्याच प्रमाणात विम्याचे अर्ज रिजेक्ट होतात. योग्य कागदपत्रे नसलेले अर्ज त्रुटीत येतात. ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा भरत असताना अर्ज चुकतो अश्या शेतकऱ्यांचा अर्ज विमा कंपन्याकडुन त्रुटीत टाकल्या जातात.

 

पिकविमा भरत असताना शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रे दिले नाहीत अश्या शेतकऱ्यांना पिकविमा मिळत नाही. ते शेतकरी पिकविम्यापासुन वंचित राहतात. पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना आपला अर्ज मंजूर झालाय की नामंजूर करण्यात आला आहे या बद्दलची कुठलीच माहिती नसते. आपला अर्ज मंजूर झालाय कि नामंजूर करण्यात आला आहे हे मोबाईल वर कसे चेक करायचे या बद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणुन घेऊया.

1) त्यासाठी सर्वप्रथम गुगलवर पिक विमा असे सर्च करा. त्यानंतर PMFBY या वेबसाईटला क्लिक करा.

2) या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर application status असा दिसेल त्यावर क्लिक करा.

3) त्यानंतर तिथे दुसरे पेज ओपन होईल तिथे reciept no. टाका. त्याखाली असलेला सांकेतिक क्रमांक टाका व त्यानंतर check status या ऑप्शन ला क्लिक करा.

Check status ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचे status दाखवले जाईल. तिथे तुमचे नाव, कोणत्या वर्षासाठी तुम्ही विमा भरलेला आहे, पावती क्रमांक, गावाचे नाव. अश्या प्रकारची सर्व माहिती तिथे दाखवली जाईल.

तुम्हाला पिकविमा मिळणार का चेक करा

 

 

Leave a Comment