बांधकाम कामगार पेन्शन योजना : या कामगारांना मिळनार 12000 रूपये
बांधकाम कामगार पेन्शन योजना ; महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण पेन्शन योजना मंजूर केली आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठीनंतर आर्थिक स्थैर्य मिळेल. १९ जून २०२५ रोजी निर्गमित झालेल्या सरकारी ठरावानुसार (GR), या योजनेची पात्रतेचे अटी आणि निकष काय आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहूयात..
बांधकाम कामगार पेन्शन योजना ; पात्रता/अटी/निकष
◆ वयाची अट: अर्जदार कामगाराचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
◆ नोंदणीची अट: कामगार हा महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग किमान १० वर्षे नोंदणीकृत असावा.
◆ जर पती आणि पत्नी दोघेही नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील, तर दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शनचा लाभ घेता येईल.
◆ जर नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या जोडीदारास पेन्शन मिळू शकते..
🔷अपवाद: जे कामगार आधीच कर्मचारी राज्य विमा (Employee State Insurance – ESI) कायद्यांतर्गत किंवा इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत असतील, ते या योजनेसाठी पात्र नसतील.
- 🔶पेन्शनची रक्कम
कामगारांच्या नोंदणी कालावधीनुसार पेन्शनची रक्कम निश्चित करण्यात आली आहे…
■ १० वर्षांच्या नोंदणीसाठी: प्रति वर्ष ₹६,००० (किमान पेन्शनच्या ५०%).
■ १५ वर्षांच्या नोंदणीसाठी: प्रति वर्ष ₹९,००० (किमान पेन्शनच्या ७५%).
■ २० वर्षांच्या नोंदणीसाठी: प्रति वर्ष ₹१२,००० (किमान पेन्शनच्या १००%).
★जर पती आणि पत्नी दोघेही नोंदणीकृत असतील, तर प्रत्येकाला वार्षिक ₹१२,००० पर्यंत पेन्शन मिळू शकते.
बांधकाम कामगार पेन्शन योजनाअर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे:
अर्ज: विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य उपलब्ध आहे.
अर्जाची जमा करण्याची जागा: पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याच्या बांधकाम कामगार सुविधा केंद्रात (WFC) जमा करावा लागेल, जिथे कामगाराचे आधार कार्ड नोंदणीकृत आहे.
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
बँक पासबुकची प्रत
अर्जातील तपशील: अर्जामध्ये कामगाराचे नाव, नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, पहिली नोंदणीची तारीख, पहिल्या नोंदणीचा जिल्हा आणि नोंदणी नूतनीकरणाच्या कालावधीचा तपशील भरावा लागेल. तसेच, बँक खात्याचे तपशील आणि इतर कोणत्याही पेन्शनचा लाभ घेत नसल्याची घोषणा देखील करावी लागेल.
या योजनेचा जीआर (GR) आणि अर्ज नमुना maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. व्हिडिओच्या वर्णनात याबद्दलची लिंक दिलेली आहे.
ही पेन्शन योजना महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या वृद्धापकाळातील गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना वयाच्या साठीनंतर सन्मानाने जीवन जगता येईल.