भांडी संच वाटप योजनेत दोन महत्त्वाचे बदल, आता या 10 वस्तू मिळनार
महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कल्याणकारी महामंडळातर्फे (MahaBOCW) बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये, विशेषतः घरगुती भांडी संच वाटप आणि सुरक्षा किट वाटप योजनांमध्ये, राज्य शासनाने 18 जून 2025 रोजी महत्त्वाचे बदल केले आहेत. भांडी संच वाटप योजना यामध्ये काही वस्तू वाढविन्यात आल्या आहेत.
भांडी संच वाटप योजना
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे..या संचाच्या वितरणासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवली जाईल, आणिया संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश असनार आहे.
● पत्र्याची पेटी
● प्लास्टिक चटई
● धान्य साठवण कोठी (25 किलो)
● धान्य साठवण कोठी (22 किलो)
● बेडशीट
● चादर
● ब्लँकेट
● साखर ठेवण्यासाठी 1 किलोचा डबा
● चहा पावडर ठेवण्यासाठी 500 ग्रॅमचा डबा
● वॉटर प्युरिफायर (18 लिटर क्षमता)
सुरक्षा किट वाटप योजना:
या योजनेसाठी देखील पात्र बांधकाम कामगारांना अर्ज करावा लागनार आहे आणि सुरक्षा किटमध्ये खालील वस्तू समाविष्ट असनार आहेत..
● सुरक्षा हार्नेस बेड
● सुरक्षा बूट
● कानासाठी एअर प्लग
● मुखपट्टी (मास्क)
● रिफ्लेक्टिव्ह जॅकेट
● हेल्मेट
● सुरक्षा हातमोजे
● सेफ्टी ग्लाऊज (गॉगल)
● मच्छरदाणी
● पाण्याची बाटली
● स्टीलचा जेवणाचा डबा
● सोलरवर चालणारी टॉर्च
● ट्रॅव्हल किट बॅग (प्रवासी बॅग)
यापूर्वी भांडी वाटप योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे, आता मागणीनुसार आणि अधिक पारदर्शकतेने या योजना राबवण्यासाठी हे बदल करण्यात आले आसून हे दोन्ही शासन निर्णय (GR) महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.