मागेल त्याला सौर पंप; अर्ज केल्यानंतर इतक्या दिवसात तुम्हाला सोलर पंप मिळेल….
मागेल त्याला सौर पंप; शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्रभर जागून राहावे लागू नये यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सौरपंप योजना राबविण्यात येते. सध्या महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने सौरपंप देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Solar pump scheme)
नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना सौर पंप योजनेसाठी अर्ज केल्यापासून अवघ्या तीन महिन्यांत सौरपंप मिळेल. सौरपंप योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. (Magel tyala solar pump scheme 2024-25)
येत्या दोन वर्षांत सौरपंप योजनेंतर्गत नऊ लाख (०९/लाख) नवीन सौरपंप बसविण्यात येणार असून, मागेल त्याला सौरपंप दिले जातील, असे फडणवीस म्हणाले. अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत वीज कनेक्शन नसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यात येणार आहेत. (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर अधिवेशन लाईव्ह)
जर तुम्ही अद्याप सौर पंप योजनेचा लाभ घेतला नसेल, तर आवश्यक कागदपत्रांसह त्वरीत अर्ज करा आणि अर्ज सबमिट होताच तुम्हाला पेमेंटचा पर्याय मिळेल. पैसे भरल्यानंतर, तुमची कागदपत्रे योग्य आणि बरोबर असल्यास, तुम्हाला तीन महिन्यांत सौर पंप मिळेल. (Mukyamantri Devenra Fadnvis Nagpur Season Live 2024)