मुख्यमंत्री फडणवीस; देवेंद्र फडणवीस या दोन योजनांवर भर देणार
मुख्यमंत्री फडणवीस ; देवेंद्र फडणवीस यांनी 05/डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून त्यांच्या सोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी पुर्ण झाल्यावर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनेक विकास कामाबद्दल माहिती दिली. येत्या काळात पूढील दोन योजनावर फोकस करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होईल
मुख्यमंत्री फडणवीस राज्यात वारंवार होत असलेल्या अपुऱ्या पावसामुळे विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. या दुष्काळाचा फटका सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना अधिक जाणवत असल्याने महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (महाराष्ट्र शासन योजना)
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवला जाणार असून मराठवाडा आणि विदर्भासह महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी काम करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अपारंपरिक ऊर्जेवर भर देऊन जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती योजनेसाठी काम करणार मुख्यमंत्री फडणवीस
तसेच अपारंपरिक ऊर्जेवर भर देऊन जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती योजनेसाठी काम करणार आणि शेतकऱ्यांसाठी सौरपंप योजना राबवून अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)