लाडकी बहिण योजना ; या महिलांना फक्त 500 रुपये मिळणार…
लाडकी बहिण योजना ; राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रूपये दिले जातात. लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यानुसार अनेक महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत, पाहुया सविस्तर माहिती…
लाडकी बहिण योजनेच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या अटी, पात्रता आणि निकषांनुसार केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6000 रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6000 रुपये, असे एकूण 12000 रुपये शेतकरी लाभार्थींना मिळतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात, त्यांना आता दरमहा दीड हजार रुपयांऐवजी अवघे 500 रुपयेच राज्य सरकार देणार आहे.
तसेच लाडकी बहिण योजनेत अनेक महिला अशा आहेत कि त्यांना फेब्रुवारी, मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तरी ज्या महिलांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्या महिलांना यापुढे एकही हप्ता मिळणार नाही. तरी महिलांनी हे लक्षात घ्यावे.
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचे वय 21 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा महिलांसाठी नवीन अर्ज सुरू होतील आणि त्याबद्दल अधिकृत माहिती सरकार कडून दिली जाईल. नवीन अर्ज कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या ज्या महिलांचे वय 65 वर्षे पूर्ण झाले अशा महिलांचे हप्ते कायमचे बंद करण्यात आले आहे.