लाडकी बहीण कर्ज योजना ; या महिलांना मिळनार 1 लाख बिनव्याजी कर्ज,पहा काय आहे योजना
लाडकी बहीण कर्ज योजना ; लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजाराचा हप्ता दिल्यानंतर आता विनब्याजी कर्ज देण्याची योजना आखण्यात येत आहे…या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुंबै बँक प्रयत्न करणार असल्याचं मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय.
लाडकी बहीण कर्ज योजना
शासनाच्या चार महामडंळातील विविध योजनांमधून कर्जावर सवलत देण्यात येणार आहे. पर्यटन महामंडळाची आई योजनेसह अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. ज्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, त्या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं, व्याजाचा परतावा संबंधित महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे, असं मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चारही महामंडळाचे संचालक आणि संबंधित खात्याच्या सचिवांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे. एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं.
लाडकी बहीण कर्ज योजना ; फक्त या महिला पात्र
या योजनेत कर्जासाठी मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळेल, त्यासाठी व्यवसायाची तपासणी केली जाईल. आम्ही व्याजाचा परतावा महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये 12 ते 13 लाख लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत. तर 1 लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत अशी माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली.