लाडकी बहीण योजना ; जूनचा हप्ता या तारखेला येनार, कर्जही मिळनार…
लाडकी बहीण योजना ; जून महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. या दिवसांत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याचसोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजना ; Ladki Bahin Yojana Women Get Loan
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरु करण्यात येणार आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की, सरकार लवकरच नवीन योजना सुरु करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ४०,००० रुपयांपर्यंतचे बँक लोन देईल. यामधून महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करतील. याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
महिलांना कसं मिळणार लोन ? (Ladki Bahin Yojana Loan Scheme)
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत.
लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेससंबंधित माहिती द्यावी लागणार आहे.
महिलांना जे १५०० रुपये मिळतात. त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहे. जेणेकरुन महिलांवर पैशांचा अतिरिक्त भार पडणार नाही.
पात्रता (Ladki Bahin Yojana loan Eligibility)
◆ महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
◆ महिलांचे वय हे २१ ते ६५ वयोगटातील असावे.
◆ महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
◆ महिलांकडे कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे.
◆ महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत नसावे.
◆ लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही सरकारी योजना लाभ घेतलेला नसावा.