हवामान अंदाज : पुढील तीन ते चार तासात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट
राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वादळी वारे आणि विजांसह आवकाळीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आसून काही ठिकाणी गारपीटीचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय…
कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातही ढगाळलेलं वातावरण पहायला मिळत आसून पुढचे 4 ते 5 दिवस आवकाळी पावसाची शक्यता आहे… यादरम्यान वादळी वारे, विजा तसेच काही भागात गारपीटीचा तडाखा बसू शकतो अशी माहिती हवामान विभागाने दिलीय…
राज्यात आज सकाळपासूनच ढगाळलेलं वातावरण आणि गर्मी वाढली आसून येत्या 3-4 तासात नाशीक,आहील्यानरग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सांगली, सातारा,कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे..तसेच जालना, बिड,सोलापूर, धुळे,नंदुरबार, आणि जळगावात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींची अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे..
उद्या ,1 एप्रिलपासून आवकाळी पावसाचा जोर वाढनार आसून मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकनात आवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तविण्यात आलाय..