हिवाळी अधिवेशनात 35,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर...
हिवाळी अधिवेशन नागपूर ; नागपुरात सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, सर्व आमदारांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे पवार म्हणाले.
सर्व रखडलेल्या कामांसाठी तसेच काही नवीन कामांसाठी निधीची मागणी आमदारांनी केली आहे. यावर अजितदादा पवार म्हणाले की, पुरवणी मागण्यांमध्ये जेवढे मुद्दे सोडवता येतील तेवढे दूर करून आगामी अर्थसंकल्पात काही प्रमुख प्रश्नांसाठी तरतूद केली जाईल. (हिवाळी अधिवेशन नागपूर)
अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना लेखी उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. या अधिवेशनात आतापर्यंत महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाण, नगरविकास, कृषी व संवर्धन, ओबीसी, जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, ग्रामीण विकास, पाटबंधारे या विभागांसाठी 35000 कोटी रुपयांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. विकास महामंडळे, आदिवासी विकास, पणन, सहकार इ.
विभागनिहाय मंजूर निधी खालीलप्रमाणे आहे (नागपूर अधिवेशन 2024)