Cotton news ; यंदा कापसाला जास्तीत जास्त किती बाजारभाव मिळेल – बाजारतज्ञ
Cotton news ; सध्या कापसाला बाजारात हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतोय. कापसाला मिळणारा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडत नसल्याची शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कापूस बाजारातील अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार कापसाचे दर का कमी झाले आणि दरवाढ होऊ शकते का तसेच बाजारात सुधारणा कधीपर्यंत होऊ शकते याबाबत माहिती पाहणार आहोत.
cotton news ; राज्यात सध्या कापसाला किती दर मिळतोय?
cotton news ; यंदा (2024-25) केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी कापसाला 7521 रूपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात कापसाला 6900 ते 7000 रुपये प्रती क्विंटल एवढा भाव मिळत आहे. कापसाला हमीभावापेक्षा 500 रूपया पेक्षा कमी दर मिळतोय.
बाजार अभ्यासकाच्या मते कापसाचे भाव का पडले…
कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडीवर जोडलेले असतात. जागतिक मागणी कमी-जास्त होत असते. भारतात एकूण जागतिक कापूस उत्पादनाच्या जवळपास 24% उत्पादन घेतले जाते. कापूस क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. चारुदत्त मायी सांगतात, कापूस हा असा उद्योग आहे ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम होतो.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन घेणारे जे देश आहेत यामध्ये अमेरिका, चिन, मिडल ईस्टमधील उझबेकिस्तान, पाकिस्तान यांचा जो काही एक दर ठरतो त्याप्रमाणे आपल्याकडील बाजारभावाची तुलना होते.
आंतरराष्ट्रीय बाजारभाव आजघडीला 7000 रूपयापेक्षा कमी आहे त्यामुळेच सध्या भारतात कापसाला भाव मिळत नाही. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य कॉटन फेडरेशनचे सेवानिवृत्त महाप्रबंधक गोविंद वैराळे सांगतात आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी असल्याने कापसाची आयात वाढलेली आहे. भारतात 30 लाख गाठींची आयात झालेली आहे. तसेच कापसाला स्पर्धा करणारा कृत्रिम धागा स्वस्त आहे या कारणांमुळे कापसाचे भाव पडले आहेत.
यंदा कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो?
यंदा आकडेवारीनुसार (2024-25) मध्ये देशात 112 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. मागिल वर्षीच्या तुलनेत यामध्ये 10 लाख हेक्टर एवढी घट झाली त्यामुळे कापूस उत्पादन यंदा 07 % घटण्याचा अंदाज Cotton Association of India (CAI) ने वर्तवला आहे. चारुदत्त मायी सांगतात पुढच्या काही महिन्यांमध्ये कापसाचे बाजारभाव 7500 ते 7800 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात रेट वाढण्याची शक्यता आहे.
बाजार अभ्यासक गोविंद वैराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कापसाला यंदाच्या हंगामात 7500 रुपयांच्या आसपास भाव मिळू शकतो. कापसाचे भाव 7200 ते 7800 रुपयांदरम्यान राहू शकतात.