Magel tyala solar ; मागेल त्याला सोलार पंप योजनेत पेमेंट केल्यानंतर पंप मिळतोच का
Magel Tyala Solar : शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर पंप योजनेत पैसे भरले आहेत. पुढे त्यांच्या अर्जांची छाननी केली जात असून त्यात काही त्रुटी आढळून येत आहेत. त्रुटींमुळे त्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्यास सांगण्यात आले आहे. (Magel tyala solar pump payments prizes)
या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत की आम्ही पेमेंट केले आहे मग आता काय अडचण आहे? या योजनेतील अंमलबजावणीची प्रक्रिया नेमकी काय आहे? जर पेमेंट केले तर आम्हाला सोलर मिळतो का? पैसे भरलेल्या प्रत्येकाला सोलर मिळणार का तरी मागेल त्याला सौर पंप योजनेत शेतकऱ्यांनी पेमेंट केल्यानंतर पुढील प्रोसेस नेमकी कशी असते याबाबत माहिती पाहुया. (Magel tyala solar pump scheme)
मागेल त्याला सौर पंप योजनेत अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करताना काही अडचणी आल्यास शेतकऱ्याला कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाते. ज्या अर्जासाठी कागदपत्रे अपलोड केली गेली आहेत त्यांना पेमेंटचा पर्याय देण्यात आला आहे. आणि त्यानंतर लगेचच पेमेंट करण्यासाठी सांगितले जाते. अर्ज पुर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे भरावेच लागतील. तुम्हाला पेमेंट करण्याचा पर्याय दिला जाईल. तुम्हाला तुमच्या अर्जानुसार पेमेंट करावे लागेल.(Maharashtra government scheme 2025)
पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला ताबडतोब सोलर मिळेल की सोलर मिळेल? पुन्हा वेंडर निवड आहे का? पात्र अर्जाला कंपनी निवडीचा पर्याय दिला जातो. अर्जात काही अडचणी असतील जसे की, 7/12 वर पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही, आधार कार्डचे नाव आणि सातबारा नावात बदल, सामायिक जमीन असल्यास, सामायिक संमतीपत्र जोडलेले नाही, अशी विविध कारणांमुळे अर्जात त्रुटी येतात या त्रुटी काढाव्या लागतात. (Solar pump scheme)
तुमच्या अर्जात अशी काही समस्या असल्यास तुम्हाला कागदपत्रे पुन्हा अर्ज करण्यास सांगितले जाते. जेणेकरून पुढील प्रक्रियेत त्याचा समावेश केला जाईल, म्हणजेच पैसे भरल्यानंतर ही अर्ज पूर्ण तपासणी नंतरच पुढे जाईल. त्यानंतर कंपनीच्या माध्यमातून संयुक्त सर्वे केला जातो. ही प्रक्रिया सोलर पंप बसवण्यापुर्वी केली जाते. यामध्ये सोलर कंपनीचे प्रतिनिधी, mseb चे कर्मचारी आणि शेतकरी यांचे संयुक्त सर्वेक्षण केले जाते. यावेळी अनेक गोष्टी तपासल्या जातात. येथेही काही अडचण आल्यास पुन्हा अर्ज रखडण्याची शक्यता आहे. हा सर्वे झाल्यावर कंपनी मार्फत सौर पंप मटेरियल पाठवले जाते. आणि सोलर पंप बसवला जातो. अशा पद्धतीने मागेल त्याला सोलर पंप योजनेत अर्ज केल्यापासून ते सौर पंप बसवण्यापर्यत वरील प्रोसेस पूर्ण केल्या जातात.
अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा