Namo shetkari yojna : नमोचा हप्ता या दिवशी मिळणार, तारीख निश्चित…
Namo shetkari yojna : अनेक दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखेर दि. 28/मार्च रोजी सहावा हप्ता कधी मिळणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले आहे. याबाबत शासन निर्णय (Government GR) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच सहाव्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
(Pm kisan yojna) पिएम किसान योजनेच्या 19/व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळत होता. मात्र, मागील हप्त्यादरम्यान, फक्त पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला होता. त्या दिवसांपासून शेतकरी नमोचा हप्ता कधी येणार असे विचारत होते. अखेर, आज दि. 26/मार्च रोजी यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्यासाठी आणि मागील हप्त्यांच्या प्रलंबीत निधी साठी लाभार्थ्यांना 2168 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नमो शेतकरी योजनेत वार्षिक 6000 रूपये मिळतात पण देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 3000 रूपयांची वाढ होऊन वार्षिक 9000 रूपये मिळणार आहे. परंतु अद्याप या योजनेत बदल झालेलेल नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याबद्दल निधी वितरण करण्यात आले आहे. उद्या पासून (दि.29/मार्च) 93.26 लाख शेतकऱ्यांना 2169 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यात 2000 रुपयाचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.