पंजाबराव डख लाईव्ह : या तारखेपासून पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज…

पंजाबराव डख लाईव्ह : या तारखेपासून पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज…

पंजाबराव डख लाईव्ह : राज्यात मागील सात आठ दिवसापासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झालीय. ऐन काढणीच्या वेळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना नवीन अंदाज दिला असून सतर्क केले आहे. पंजाबराव डख म्हणतात की राज्यात येत्या 7/8 दिवसात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज आहे तरी शेतकऱ्यांनी सावध रहावे.

पंजाबराव डख यांनी नवीन अंदाजात सांगितले की 06/एप्रिल पासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होईल. तापमान 45 अंशापर्यंत जाईल यादरम्यान शेतकऱ्यांनी पाळीव प्राणी तसेच स्वतःची काळजी घ्यावी, तसेच 14/एप्रिल पर्यंत कांदा, हळद इतर काढणीला आलेले पिके काढुन घ्यावी कारण 14/एप्रिल पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

दि. 06/एप्रिल ते 14/एप्रिल यादरम्यान कडक उन असेल तापमान वाढेल, यादरम्यान शेतकऱ्यांनी पिकांची काढणी पुर्ण करावी कारण 14/एप्रिल पासून पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तरी शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार पुढील नियोजन करावे. (पंजाबराव डख)

पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज खालील YouTube video मध्ये लाईव्ह पहा…

 

Leave a Comment

Close Visit agromedia24