Home lone होम लोन घेताना या गोष्टी लक्षात ठेवा……

Home lone होम लोन घेताना या गोष्टी लक्षात ठेवा……

Home lone मोठ्या शहरात चांगल्या पाॅईट वर आपलं घर असावे , मोठ्या शहरात चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या घरात राहण्याचे स्वप्न असते. अशा मोठ्या शहरात घर असल्यावर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.मुलांच्या शिक्षणाची सोय चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळे लोक शहरात घर घेण्यासाठी इच्छुक असतात. घर घेण्यासाठी बचतीकडे लक्ष तसेच खासगी कर्ज , बॅकेकडून कर्ज घेण्यासाठी धडपड करत असतात. पण घरासाठी कर्ज घेत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.

Home lone घरासाठी कर्जाची पात्रता कशी ठरते.

घरासाठी कर्ज घेत असताना जितके कमी वय असेल तेवढ्या लवकर होमलोन साठी मंजुरी मिळते. सर्वीस ला असलेल्या पगारदार किंवा स्वतः चा बिझनेस असल्यास home lone घरासाठी कर्ज लवकर मिळते.

चांगला सिबिल स्कोअर असेल तर लोनसाठी मंजुरी लवकर मिळते.जर सिबील स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर कर्ज सहज उपलब्ध होते. त्याचबरोबर तुमच्याकडे सध्या असलेल्या कर्जाचे मुल्यमापन करून परत फेडीची क्षमता तपासल्यावर कर्ज दिले जाते.

होमलोन साठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत

1) आधार कार्ड , पॅनकार्ड , मतदान कार्ड , वाहन चालक परवाना , नियोक्ता ओळखपत्र , सॅलरी स्लिप , व्यवसाय पत्याचा पुरावा ,विज बील , एक फोटो , मागिल सहा महिन्यांचे जुने बॅक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

घरासाठी किती कर्ज मिळते ?

घरासाठी मिळणारे कर्ज हे घराच्या एकुण किमतीच्या 80/90% एवढी रक्कम होमलोन म्हणून मिळत असते.यामधे नोंदणी, हस्तांतरण आणि मुद्रांक शुल्क या सर्वांचा समावेश असतो. होमलोन देताना तुमच्या मासिक पगाराच्या 50% एवढी रक्कम कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी गृहित धरले जाते. मग महिन्यात तुमच्या हातात जेवढे जास्त पैसे येतील तेवढेच तुम्हाला जास्त पैसे मंजूर होत असते.

Leave a Comment

Close Visit agromedia24