लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार – मंत्री आदिती तटकरे…

लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार – मंत्री आदिती तटकरे…

महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती. या लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत.

महिलांना जुलै 2024 ते मार्च 2025 पर्यंत हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले आहे. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना)

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने म्हणजेच 30/ एप्रिल रोजी या योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड ठरणार आहे. विशेषतः यावर्षी लाभार्थ्यांची संख्या कमी होईल की वाढेल असा प्रश्न उपस्थित केला जात असताना, आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. (Maharashtra government scheme)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत बनावट अर्जदारांना कोणतेही मानधन वाटप करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले होते आणि सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू आहे. या योजनेसाठी अर्जदारांपैकी जवळपास 11 लाख अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. (Mmlby)

Leave a Comment

Close Visit agromedia24