सोयाबीन वान/जाती ; सोयाबीनचे टाँप ०५ वान, या वानांची पेरणी करा उत्पादन वाढवा
लवकरच खरीपाच्या पेरणीला सुरुवात होनार आसून खरीपात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते..सोयाबीन चे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोनत्या सोयाबीन वानांची पेरणी करावी याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या लेखातून जानून घेउयात…
सोयाबीन वान/जाती top 5 variety
1) फुले किमया (के डी एस 753) : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण सन 2017 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व इतर काही राज्याकरिता शिफारशीत केला असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस असून हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडतो म्हणून शिफारशीत आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादकता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे.
2) फुले संगम (के डी एस 726) (Fule Sangam vaan) : हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2016 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागाकरिता शिफारशीत केलेला सोयाबीनचा वान आहे. या वाणाचा परिपक्वता कालावधी 100 ते 105 दिवस आसून या वाणाची हेक्टरी उत्पादकता 23 ते 25 क्विंटल आहे.
3) एम ए यु एस 612 : हे सोयाबीन वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेले असून या वानाचा परिपक्वता कालावधी 93 ते 98 दिवस असून हा वाण कमी ओलाव्यास व शेंगा तडकणे संदर्भात सहनशील म्हणून शिफारशीत आहे. सोयाबीन वरील विविध रोग व किडीसाठी सुद्धा तुलनात्मकदृष्ट्या प्रतिकारक्षम म्हणून हा वाण शिफारशीत असून मशीन द्वारे काढणीसाठी योग्य आहे.
4) जे एस 93 -05 : हे सोयाबीनचे वाण कमी कालावधीत परिपक्व होणारे असून या वाणाचा फुलावर येण्याचा कालावधी 35 ते 37 दिवस असून परिपक्वता कालावधी 90 ते 95 दिवस एवढा आहे. फुलाचा रंग जांभळा असून 100 दाण्यांचे वजन 11 ते 12 ग्रॅम असत. या वाणात तेलाचा उतारा 18 ते 19 टक्के असून हेक्टरी उत्पादकता ते 20 ते 24 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. तुलनात्मकदृष्ट्या हा वाण कीड रोग प्रतिकारक्षम आहे. Top 5 सोयाबीन वान/जाती
5) फुले दुर्वा (KDS-992) ; सोयाबीनचे ‘फुले दुर्वा’ हे वाण (KDS-992) मध्यम कालावधीत परिपक्व होते, तसेच ते पिवळा मोझॅक रोगास प्रतिकारक आहे. हे वाण उंच वाढणारे, वातावरण बदलांना तग धरणारे आणि दुष्काळ परिस्थितीतही चांगले उत्पादन देणारे आहे.
फुले दुर्वा (KDS-992) सोयाबीन वाणाचे वैशिष्ट्ये:
परिपक्वता कालावधी:
100 ते 105 दिवस
पिवळा मोझॅक रोगास प्रतिकार:
हे वाण पिवळा मोझॅक रोगास प्रतिकारक आहे.
चक्रीभुंगा व खोडमाशी किडीस मध्यम प्रतिकार:
हे वाण चक्रीभुंगा आणि खोडमाशी या किडीस मध्यम प्रमाणात प्रतिकार करते.
शेंगा फुटण्यास प्रतिकार:
परिपक्वतेनंतर 10 दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.