fertilizer rate ;रासायनिक खतांचे नवीन दर जाहीर, जानून घ्या 2025 साठीचे खतांचे भाव

fertilizer rate ;रासायनिक खतांचे नवीन दर जाहीर, जानून घ्या 2025 साठीचे खतांचे भाव

राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलासह शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यानं आर्थिक फटका बसत असताना आता रासायनिक खतांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढत आहेत. खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली आसून त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 50 रुपयांपासून ते 300 ते 350 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. (fertilizer price)

मान्सून केरळमध्ये दाखल,या तारखेला महाराष्ट्रात ; पहा सविस्तर

fertilizer price 2025

खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढीव दरानुसार डीएपी डाय अमोनिया फॉस्फेट खताची किंमत प्रती बॅग 1 हजार 350 रुपयांवरून 1 हजार 590 रुपये झाली आहे. तर 10:26:26 आणि 12:32:16 या खतांच्या किमती 1470 रुपयांवरून 1725 रुपये होणार आहेत.तर सुपर फॉस्फेट 470 वरून 520 रुपयांपर्यंत दर वाढणार आहेत.

केंद्र सरकारने 2025 साली खताच्या नवीन दर जाहीर केले आहेत. यामध्ये डीएपी, एनपीके, एसएसपी अशा विविध प्रकारच्या खत्यांचा समावेश आहे. हे दर 1 जानेवारी 2025 पासून लागू झाले आहेत. या नवीन दरांचा तपशील खाली दिला आहे.

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज ; येथे पहा

१) डीएपी (DAP): 50 किलो बॅग ₹1350.
२) एनपीके 10-26-26: 50 किलो बॅग ₹1725.
३) एनपीके 12-32-16: 50 किलो बॅग ₹1470.
४) एनपीएस 2020 013: 50 किलो बॅग ₹1300.
५)एनपी 14.28.0: 50 किलो बॅग ₹1700.
६)एनपीके 14-28-14: 50 किलो बॅग ₹1795.
७)एनपी 24-24 0: 50 किलो बॅग ₹1650.
८)एनपी 28-28-0: 50 किलो बॅग ₹1700.
९)एनपीके 14 35 14: 50 किलो बॅग ₹1800.
१०) एमओपी (MOP): 50 किलो बॅग ₹1550.
११) नीम कोटेड युरिया (Neem Coated Urea): 45 किलो बॅग ₹206.65.
१२) एसएसपी ग्रॅन्युएटेड: 50 किलो बॅग ₹570.
१३) एसएसपी पावडर: 50 किलो बॅग ₹530.
१४) एसएसपी झिंकेटेड बोरनेटेड: 50 किलो बॅग ₹700.

शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वाढलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता वाढणाऱ्या रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.

Leave a Comment

Close Visit agromedia24