अतिवृष्टी अनुदान ; या 32 जिल्ह्यातील अतिवृष्टी बधीत नागरीकांना ₹64.75 कोटींचा निधी मंजूर

अतिवृष्टी अनुदान ; या 32 जिल्ह्यातील अतिवृष्टी बधीत नागरीकांना ₹64.75 कोटींचा निधी मंजूर

अतिवृष्टी अनुदान ; जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित मात्र अजुनही मदत न मिळालेल्या नागरिकांना महाराष्ट्र शासनाने मदत मंजूर केली आहे. यासंदर्भातील GR
12 जून 2025 रोजी, महाराष्ट्र शासनाने काढला आसून राज्यातील 32 जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना मदतीचं वितरण करण्याला मंजूरी देण्यात आली आहे.

शेती आणि शेतजमिनीचे नुकसान वगळता, इतर मालमत्तेच्या नुकसानीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे .

अतिवृष्टी अनुदान ; या 32 जिल्ह्यात मंजूर

1️⃣ नागपूर विभाग : गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा

2️⃣ कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग

3️⃣ छत्रपती संभाजीनगर विभाग : छ.संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली

4️⃣ अमरावती विभाग : यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा

5️⃣ पुणे विभाग : पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली

6️⃣ नाशिक विभाग : अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव

अतिवृष्टी अनुदान मदतीचा तपशील पुढीलप्रमाणे

■ निवारा केंद्रातील खर्च (अन्न, वस्त्र, निवारा, औषधे): ₹51.99 लाख

■ पुरामुळे बाधित घरे किंवा घरांची पडझड: ₹49.63 कोटी

■ मत्स्य व्यावसायिकांचे नुकसान: ₹1.69 कोटी

■ दुकानदार आणि टपरीधारकांचे नुकसान: ₹12.91 कोटी

★ एकूण अनुदानाची मंजूर रक्कम: ₹64.75 कोटी ★

अधिक माहितीसाठी हा जीआर (सरकारी निर्णय) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट (maharashtra.gov.in) वर उपलब्ध आहे

Leave a Comment

Close Visit agromedia24