20000 अनुदान ;आजपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होन्यास सुरुवात…
महाराष्ट्र सरकारने 2024 च्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 20,000 रुपये धानाचा बोनस जाहीर केला, ज्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला जास्तीत जास्त 40,000 रुपयांपर्यंत बोनस मिळू शकेल. या योजनेसाठी 1800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हा बोनस मिळणार आहे.बोनस वितरणात घोटाळा झाल्यामुळे, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा तपासणी केली गेली, त्यामुळे वितरणास उशीर झाला.
12 जूनपासून निधीचे वितरण सुरू झाले असून, 16 जून 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित आहे.गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच बोनस मिळेल.
20000 अनुदान ; शेतकऱ्यांना खुशखबर
सध्या राज्यात खरीप हंगामाची (Kharif Season) लगबग सुरू आहे. पेरणीसाठी खते, बियाणे खरेदी तसेच इतर शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची निकड असते. हा बोनस जर १५ दिवस आधी मिळाला असता तर शेतकऱ्यांना अधिक फायदा झाला असता, अशी भावना व्यक्त होत असली तरी, आता मिळत असलेल्या या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच मोठा आधार मिळणार आहे. खप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना, शासनाने दिलेला शब्द पाळल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.