Aadhaar update ; आधार कार्ड अपडेट करा मोबाईलवरून, पहा कसे करायचे ?आ
आधार कार्ड अपडेट करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत: ऑनलाइन पद्धत आणि जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन. 14 जून 2026 पर्यंत ही सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.
Aadhaar update ; ऑनलाइन अपडेट करता येणारी माहिती
तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता यांसारखी माहिती ऑनलाइन अपडेट किंवा दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in या UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
ऑनलाइन अपडेटची प्रक्रिया:Aadhaar update
◆सर्वप्रथम, https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा.
◆येथे ‘Log in’ पर्यायावर क्लिक करा.
◆तुमचा आधार कार्ड नंबर टाका, त्यानंतर कॅप्चा (Captcha) भरा आणि ‘Send OTP’ पर्यायावर क्लिक करा.
◆तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP (वन टाइम पासवर्ड) येईल. तो येथे टाका आणि ‘Log in’ वर क्लिक करा.
◆’My Aadhaar’ पेजवर जा:
◆लॉगिन झाल्यावर ‘My Aadhaar’ नावाचे एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला विविध सेवांची यादी दिसेल.
◆त्यातील ‘Online Update Services’ या रकान्यावर क्लिक करा. एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल.
◆’Update Aadhaar Online’ निवडा:
◆येथील ‘Update Aadhaar Online’ या रकान्यात क्लिक करा. आता पुन्हा एक नवीन पेज उघडेल.
या पेजवर आधार अपडेट कसे होते याची सविस्तर प्रक्रिया 9 मुद्द्यांमध्ये सांगितलेली असेल. UIDAI पोर्टलवरून तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता, अशी सूचना पहिल्याच मुद्द्यात दिलेली असेल.
माहिती अपडेट करण्यासाठी पुढे जा:Aadhaar update
● ‘Proceed to Update Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
● नवीन पेजवर तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता यापैकी जे काही अपडेट करायचे आहे, तो एक पर्याय निवडायचा आहे.
● उदाहरणार्थ, जर तुम्हाला पत्ता (Address) अपडेट करायचा असेल, तर ‘Address’ या रकान्यावर क्लिक करा आणि ‘Proceed to Update Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
●नवीन माहिती भरा
● येथे ‘Current Details’ रकान्यात तुम्हाला तुमचा आधीचा पत्ता दिसेल.
● ‘Details to be Updated’ या रकान्यात जी माहिती अपडेट करायची आहे ती तुम्हाला भरायची आहे. सुरुवातीला इंग्रजी आणि मग मराठीत नाव टाकावे लागेल.
● ‘Area’ या रकान्यात गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव टाका. हीच माहिती खालच्या रकान्यात मराठीत टाका.
● पुढे पिन कोड (Pin Code) टाकला की राज्य आणि जिल्ह्याचे नाव आपोआप येते.
● त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव (Village) आणि पोस्ट ऑफिसचे (Post Office) नाव निवडायचे आहे.
● लागनारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
●’Select Valid Supporting Document Type’ या रकान्यामध्ये दिलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र निवडा.
● त्यानंतर ‘View details and upload documents’ वर क्लिक करा.
● स्क्रीनवर एक सूचना येईल, ती वाचून ‘Continue to upload’ वर क्लिक करा.
● हे डॉक्युमेंट अपलोड झाले की ‘Next’ वर क्लिक करा.
● अपडेट केलेल्या डेटाचे पुनरावलोकन आणि पुष्टी करा.
●येथे तुम्हाला तुम्ही अपडेट केलेला डेटा दिसेल. तो वाचून खाली असलेल्या दोन्ही पर्यायांवर टिक करून ‘Next’ वर क्लिक करा.
● पुढे तुम्हाला 50 रुपये एवढे पेमेंट करायचे आहे.
इथल्या सूचनेवर टिक करा आणि मग ‘Make payment’ वर क्लिक करा.
● डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, यूपीआय (UPI), नेटबँकिंग, पेटीएम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट करू शकता.
● पेमेंट यशस्वी झाले की त्याची सूचना स्क्रीनवर दिसेल.
● येथील ‘download acknowledgement’ वर क्लिक केले की तुम्हाला पेमेंट केल्याची पावती पीडीएफ (PDF) मध्ये डाउनलोड होऊन मिळेल.
● या पावतीवर तुमची आधीची माहिती आणि अपडेट करून काय हवे आहे, तेही नमूद केलेले असेल.
● आधारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 30 दिवसांत तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.
आधार केंद्रावर जाऊन अपडेट करता येणारी माहिती
तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि बायोमेट्रिक डेटा (उदा. फिंगरप्रिंट्स, आयरिस स्कॅन) अपडेट करायचा असेल, तर तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रावर (Aadhaar Seva Kendra) जावे लागेल.
Aadhaar Seva Kendraमध्ये आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क लागेल.
शुल्क भरल्यावर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (Service Request Number) दिला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटचे स्टेटस पाहू शकाल.
जवळपास 30 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला एसएमएसद्वारे (SMS) तसे कळवले जाईल.