Fertilizer prize : खरीपापुर्वीच खताच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना धक्का
Fartilizer prize : जूनपासून खरीप हंगाम सुरू होत असला तरी, सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांना आधीच धक्का दिला आहे. DAP मध्ये 150 रुपयांची वाढ प्रस्तावित असताना, 10-26-26 खताची किंमत 255 ते 275 रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे.
बीटी बियाण्यांच्या किमतीत 37 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, आता कीटकनाशकांच्या किमतीत 05 ते 10% वाढ करण्याची चर्चा आहे. दरवर्षी शेती पिकांचा उत्पादन खर्च वाढत असताना, उत्पादन त्याच्याशी जुळत नसल्याने शेती समीकरण बिघडले आहे.
यावर्षी खरीपाच्या आधीच रासायनिक खतांच्या किमती वाढू लागल्या आहेत. खतांचा रॅक बसवल्यानंतर या वेळी खतांचा भाव काय असेल हे ठरवले जात आहे. या वर्षी डीएपी (डायमोनियम फॉस्फेट) च्या किमतीत वाढ होण्याची चर्चा आहे. सध्या, डीएपीची किंमत प्रति बॅग 1350 रुपये आहे. यामध्ये 150 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. या खतावरील अनुदान बंद करून त्याची किंमत वाढवली जात आहे.
एक महिन्यापासून 10-26-26 खताची किंमत 1470 रुपयांवरून 1725 रुपये झाली आहे. शेतकरी कापूस, सोयाबीन आणि इतर बागांसाठी या खताचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. शिवाय, खतांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढत आहे.
कंपन्यांकडून दुय्यम खतांचा रासायनिक खतांची लिंकिंग चा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. विक्रेत्यांकडून या संदर्भात कोणत्याही तक्रारी नसल्याने, कृषी विभाग कारवाई करत नाही. पण हे दुय्यम दर्जाचे खत शेवटी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना विकले जाते. सध्या 10-26-26 च्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय, सध्या इतर कोणत्याही किमतीत वाढ झाली नसली तरी, शक्यता नाकारता येत नाही.