Hawaman aandaj : पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज
Hawaman aandaj : राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून हवामान खात्याने पुन्हा वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या छायेत आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी विखुरलेला पाऊस पडला, तर काही ठिकाणी गारपीट झाली. हवामान खात्याने पुढील तीन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील हवामान कडक उन्हात पावसासाठी अनुकूल आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडू शकतो. शिवाय, काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. हवामान खात्याने पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
या भागात अवकाळी पावसाचा इशारा
पुढील तीन दिवस पूर्व विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने पिवळा इशारा जारी केला आहे. राज्यातील उर्वरित भागात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.