Insurance scheme पिकविमा अर्ज भरताना या चुका करू नका ; अन्यथा विमा अर्ज बाद
Insurance scheme ; प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरिप हंगाम 2024-25 साठी पीक विमा भरण्याचे काम सुरू आहे. दि. 15 जुन ते 15 जुलै या एक महिण्यात पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी मुदत दिली आहे. पीक विमा अर्ज भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि पीक विमा अर्ज कोणत्या कारणांमुळे फेटाळले जातात व पिकविमा नोंदणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत कृषी विभागाने दिलेली माहिती पाहूया…
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत, महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे आणि पिक विमा सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर पिकविमा नोंदणी करता येते. (अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in) यंदा सुद्धा मागिल वर्षी प्रमाणे पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी एक रुपया द्यावा लागणार आहे.
पिकविमा योजनेद्वारे, दुष्काळ, अपुरा पाऊस, पावसाचा अभाव, पूर, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज, वादळ, गारपीट,चक्रिवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पीक उत्पादनाच्या नुकसानीपासून सरकार शेतकऱ्यांना सर्वसमावेशक विमा संरक्षण देत आहे.
पिक विमा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत..
1) आधार लिंक असलेले बँक पासबुक
2) आधार कार्ड
3) स्वयंघोषित पीक पेरणी प्रमाणपत्र
4) सातबारा आणि 8 अ
पीक विमा नोंदणी करताना ही विशेष काळजी घ्या – (कृषी विभाग महाराष्ट्र राज्य)
पिकविम्याची नोंदणी करताना तुमच्या आधार कार्डावरील नावानुसार अर्ज भरा. जसे आधार कार्डवर, जर तुमचे आधी आडनाव असेल नंतर तुमचे नाव आणि नंतर वडिलांचे नाव, पिक विम्याची नोंदणी करताना तेच टाका. तुमच्या आधार कार्डच्या शेवटी आडनाव असल्यास, पिकविमा नोंदणी करताना ते टाकावे. आधार प्रमाणे नाव टाकले नसल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. पिक इन्शुरन्सची नोंदणी करताना आधार लिंक असलेले खाते क्रमांक द्या
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, आजच तुमच्या जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधा..