Ladki bahin yojna ; लाडक्या बहिणींना 2100 रूपयाचा हप्ता कधीपासून मिळणार..
Ladki bahin yojna ; महायुतीने विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे सांगितले होते. आता महाराष्ट्रात महायुती सरकार आले असुन लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना लवकरच 2100 रुपये देणार असल्याचे शिंदे फडणवीस यांच्या कडून सांगितले जात आहे.
महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून आतापर्यंत या योजनेचे 1500 रूपये याप्रमाणे 7500 मिळाले आहे. या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला आहे. निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहिण योजना आता आचारसंहिता उठविल्यानंतर पुन्हा सुरू केली जाणार आहे. (Ladki Bahin Yojana News)
निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहे. आता याची अंबलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे. म्हणजेच महिलांना एप्रिलपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारने 01/जुलैपासून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले आहे. याप्रमाणे आतापर्यंत 7500 रूपयांचा लाभ महिलांना मिळाला आहे. निवडणुकीपूर्वी पुन्हा सरकार पुन्हा आल्यास महिलांना 2100 रुपये देणार असल्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता बहिणींना 2100 रुपये देणार असे एकनाथ शिंदेंनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळू शकतो. आचारसंहिता संपल्यावर महिलांना पैसे मिळणार आहे. परंतु सध्या महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. (Ladki Bahin Yojana News