Land map ; जमीनीचा नकाशा मोबाइलवर आँनलाईन पद्धतीने असा पहा..

Land map ; जमीनीचा नकाशा मोबाइलवर आँनलाईन पद्धतीने असा पहा..

Land map ; शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं.

आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

शेतजमिनीचा नकाशा (Land map) आँनलाईन मोबाईल वर कसा पहायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Land map ; जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

1️⃣ जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.

2️⃣त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

3️⃣ या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.

4️⃣ इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.

5️⃣ होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.

6️⃣ आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.

ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो. यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.

त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 37 या गटाशेजारी 29, 38, 40,46,36 अशे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.आणि मग खालच्या भागातील या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जमीनीचा नकाशा (Land map) मोबाईल वर पाहू शकता, हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की शेयर

करा..

 

 

 

Leave a Comment

Close Visit agromedia24