Mahadbt list : महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची यादी ऑनलाइन पहा

Mahadbt list : महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची यादी ऑनलाइन पहा

Mahadbt list : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजना या महाडीबीटी शेतकरी पोर्टल द्वारे राबविल्या जात आहेत. या पोर्टलद्वारे अर्ज केलेल्या अनेक लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान आता राज्य सरकारद्वारे वितरित केले जाऊ लागले आहे.

शेतकऱ्यांकडून महाडबीटी योजनांचे लाभ मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावात लाभार्थी पात्र नाहीत किंवा अशा योजनांचे लाभ दिले जात नाहीत किंवा हे अनुदान मिळत नाही. तर गावात कोणाला अनुदान मिळाले? कोण पात्र झाले? तुम्ही हे तुमच्या मोबाईलवर ऑनलाइन देखील पाहू शकता.

ऑनलाइन यादी या सोप्या पद्धतीने पहा.

१) सर्वप्रथम, महाडबीटी पोर्टलवर आल्यानंतर, तुम्हाला लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, डाव्या बाजूला तीन पर्याय दिसतील. अर्जाची सद्यस्थिती, लॉटरी यादी आणि वितरित निधी लाभार्थ्यांची यादी तपासा. ज्या लाभार्थ्यांचे अनुदान वाटप झाले आहे, ते लाभार्थी योजनेअंतर्गत पात्र आहेत.

२) अशा लाभार्थ्यांची यादी देखील पाहू शकता, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील.

३) सर्वप्रथम, जिल्हा निवडण्याचा पर्याय आहे. तुम्हाला तुमचा जिल्हा आणि नंतर तालुका, गाव निवडावे लागेल. गाव निवडल्यानंतर, तुमच्या गावाची यादी दिसून येईल, यामधून तुम्हाला तुमचे गाव निवडावे लागेल.

४) गाव निवडल्यानंतर, किती लाभार्थी पात्र आहेत? गेल्या काही वर्षांची यादी तुम्ही पाहू शकता.

५) शेवटी, २०२४-२५ मध्ये पात्र लाभार्थी झालेल्या शेतकऱ्यांची नावे तुम्ही पाहू शकता.

६) अनुदान कोणत्या तारखेला जमा झाले आहे? शिवाय, हे अनुदान कोणत्या उद्देशाने मिळाले आहे, ही माहिती देखील नमूद केली जाईल.

Leave a Comment

Close Visit agromedia24