Manikrao kokate ; कर्जमाफी पिकविमा पैशातून काय करता कृषीमंत्र्याचा शेतकऱ्यांना प्रश्न….

Manikrao kokate ; कर्जमाफी पिकविमा पैशातून काय करता कृषीमंत्र्याचा शेतकऱ्यांना प्रश्न….

Manikrao kokate : महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत केले होते. सरकार सत्तेवर येऊन तीन महिने पुर्ण झाली आहेत आता सरकारने कर्जमाफी होणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. पुढची तीन वर्षे तरी शेतकरी कर्जमाफी करण्याची परीस्थिती नाही असे अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

निवडणुकीपूर्वी केलेले आश्वासन न पाळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. शेतकरी नेते, विरोधी पक्षनेते शेतकरी कर्जमाफी साठी अडुन बसले आहेत. अशातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. कर्जमाफी, पिकविम्याच्या पैशातून काय करता असा प्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारलाय, या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा रोष व्यक्त होत आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नेमके काय म्हणाले….

नाशिकच्या माडसांगवी गावात 04/ एप्रिल रोजी कृषीमंत्र्यांनी नुकसानीचा पाहणी दौरा केला,त्यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी बाबत विचारले असता त्यांनी शेतकऱ्यांनाच हा प्रश्न विचारला कि कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे तुम्ही काय करता ? शेतीमध्ये एक रुपयाही तरी गुंतवणूक करता का ? असा प्रश्न कोकाटे यांनी विचारला आहे.

कोकाटे पुढे म्हणाले की 5 ते 10 वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघता तोपर्यंत कर्ज भरतचं नाही. विम्याचे पैसे द्या म्हणतात आणि पैसे आले की साखरपुडे कर, लग्न कर, असं करता असं कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याला सुनावले. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी शेतकऱ्याना पैसे देणार असल्याचे आश्वासन कोकाटे यांनी दिले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा रोष व्यक्त होत आहे..

माणिकराव कोकाटे काय बोलले खालील YouTube video मध्ये लाईव्ह पहा…

 

Leave a Comment

Close Visit agromedia24