Monsoon : मान्सून ची आगेकूच, पुढील 5 दिवस पाऊस कसा ? हवामान अंदाज today

Monsoon : मान्सून ची आगेकूच, पुढील 5 दिवस पाऊस कसा ? हवामान अंदाज today

मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा बराचसा भाग व्यापला आहे.२६ मे रोजी मान्सूनने राज्याचा निम्मा भाग व्यापल्यानंतर सुमारे २० दिवस तो एकाच ठिकाणी थांबला होता, कारण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नव्हते.१४ जूनपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे, कारण हवामान पोषक बनले आहे.

Monsoon : मान्सून ची जोरदार प्रगती

मान्सूनने आज संपूर्ण कोकण, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापला आहे, तसेच विदर्भाच्या बहुतांश भागात प्रवेश केला आहे.
मान्सूनने छत्तीसगड आणि ओडिशा राज्यातही प्रगती केली असून, गुजरात आणि मध्य प्रदेशातही तो दाखल झाला आहे.

पुढील २४ तासांत मान्सून विदर्भाचा उर्वरित भाग व्यापेल, तसेच छत्तीसगड, ओडिशा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागांत दाखल होईल.
पुढील दोन दिवसांत मान्सून पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागांत दाखल होण्याचा अंदाज आहे.

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

हवामान विभागाने कोकणात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. आज रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

विदर्भातील इतर जिल्हे, खानदेशातील तीन जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे .मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे.मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment

Close Visit agromedia24