Monsoon 2025 : यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होनार, या तारखेला दमदार ईन्ट्री
नैऋत्य ‘मॉन्सून’ केरळमध्ये पुढील 24 तासांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते सध्या स्थिर आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वातावरण अनुकूल आसल्याने नैऋत्य मॉन्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही उर्वरित भागांमध्ये, मालदीव आणि कोमोरॉन क्षेत्राच्या उर्वरित भागांमध्ये, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, तसेच दक्षिण-मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे…
Monsoon 2025 : वेळेआधीच महाराष्ट्रात
त्यामुळे पुढील 24 तासांत मान्सून केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. 25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आसून मुंबईत साधारण 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून जवळपास 7-8 दिवस आधीच केरळमध्ये दाखल होतोय…तसेच महाराष्ट्रातही वेळेआधीच म्हनजेच 2 जूनपर्यंत येन्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सून महाराष्ट्रात साधारणपणे 7 जून किंवा त्यानंतर दाखल होत आसतो मात्र यंदा लवकरच मान्सूनचा पाऊस बरसनार आहे..
दरम्यान पूर्व-मध्य अरबी समुद्रात, कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र 23 मे च्या संध्याकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी), मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सोलापूर), मराठवाडा (बीड, परभणी, नांदेड) आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.