Monsoon Rain ; राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता, रामचंद्र साबळे

Monsoon Rain ; राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता, रामचंद्र साबळे

या आठवड्यात पाऊस कसा राहील, कोनत्या भागात पावसाची शक्यता आणि कोनत्या भागात पावसाचा खंड राहील तसेच सर्वदूर जोरदार पावसाला सुरुवात कधी होईल याबाबत जेष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे..

Monsoon Rain ; राज्यात सर्वदूर जोरदार

सध्या हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान 30° सेल्सिअस पर्यंत वाढल्यामुळे, बाष्पीभवनाचा वेग वाढून मोठ्या प्रमाणात ढगनिर्मीती होईल,….. आणि हवेचे दाब कमी राहिल्यास उद्या 23 जूनपासून पुढे चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल.ज्या भागात पावसाचं प्रमाण कमी आहे त्या भागातही लवकरंच चांगला पाऊस पडेल असा अंदाज जेष्ठ हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान ईक्वँडोरजवळ 22° सेल्सिअस तर पेरूजवळ 17° सेल्सिअस पर्यंत घसरलं आहे त्यामुळे हिंदी महासागरावरील वारे तिकडे जाऊ शकत नाहीत, यंदाही मान्सूनवर ला निनाचा परिणाम आसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रावर आज उत्तरेला 1002 तर मध्यावर 1004 हेप्टापास्कल एवढा हवेचा दाब राहील. उद्यापासून हवेचे दाब कमी होनार आसून पावसाच्या प्रमाणात वाढ होईल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलाय..

25 जूनपासून हवेचे दाब कमी होन्याची शक्यता आसून पावसाच्या प्रमाणात वाढ होनार आहे तर 27 जूनला हवेचे दाब 1000 हेप्टापास्कलपर्यंत कमी होन्याची शक्यता आसल्याने राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडेल. ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागातही जोरदार. पावसाचं आगमन होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Close Visit agromedia24