MSP 2025: खरीप 2025 हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती भाव मिळणार?
MSP 2025: केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात ४३६ रुपयांची वाढ केली. तर कापसाच्या हमीभावात ५८९ रुपयांची वाढ केली. त्यामुळे खरिप हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव असेल, तर लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार ११० रुपये हमीभाव मिळणार आहे. तुरीचा हमीभावही ८ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आलाय.
जूनमध्ये पावसात खंड ? रामचंद्र साबळे हवामान अंदाज
MSP 2025 ; खरीप पिकांचे हमीभाव
केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ खरीप हंगामासाठी १४ पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजेच हमीभाव बुधवारी (ता.२८) जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये हमीभावाला मंजुरी देण्यात आली.
केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल ४३६ रुपयांची वाढ केली. सोयाबीनचा हमीभाव आता ५ हजार ३२८ रुपये झाला आहे. तर मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५८९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे खरिप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ७१० रुपये हमीभाव असणार आहे. तर लांब धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ११० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.
तुरीच्या हमीभावातही ४५० रुपयांची वाढ करण्यात आली. तुरीचा हमीभाव यंदाच्या खरिपात ८ हजार रुपये असणार आहे. तर मक्याच्या हमीभावातही १७५ रुपयांची वाढ करण्यात आली. मक्याचा हमीभाव आता २४०० रुपये झाला आहे. ज्वारीच्या हमीभावातही ३२८ रुपयांची वाढ करण्यात आली. हायब्रीड ज्वारीला आता ३ हजार ६९९ रुपये हमीभाव असेल. तर मालदांडी ज्वारीला ३ हजार ७४९ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.
MSP 2025: खरीप 2025 हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती भाव मिळणार?
🔸 *सोयाबीन -* 5,328 रुपये प्रति क्विंटल (436 रुपयांची वाढ)
🔸 *कापूस (मध्यम धागा) -* 7,710 रुपये प्रति क्विंटल (589 रुपयांची वाढ)
🔸 *कापूस (लांब धागा) -* 8,110 रुपये प्रति क्विंटल (589 रुपयांची वाढ)
🔸 *तूर -* 8,000 रुपये प्रति क्विंटल (450 रुपयांची वाढ)
🔸 *मका -* 2,400 रुपये प्रति क्विंटल (175 रुपयांची वाढ)
🔸 *ज्वारी हायब्रीड -* 3,699 रुपये प्रति क्विंटल (328 रुपयांची वाढ)
🔸 *ज्वारी मालदांडी -* 3,749 रुपये प्रति क्विंटल (328 रुपयांची वाढ)
🔸 *भात सामान्य -* 2,369 रुपये प्रति क्विंटल (69 रुपयांची वाढ)
🔸 *भात ए ग्रेड -* 2,389 रुपये प्रति क्विंटल (67 रुपयांची वाढ)
🔸 *बाजरी -* 2,775 रुपये प्रति क्विंटल (150 रुपयांची वाढ)
🔸 *रागी -* 4,886 रुपये प्रति क्विंटल (596 रुपयांची वाढ)
🔸 *मूग -* 8,768 रुपये प्रति क्विंटल (86 रुपयांची वाढ)
🔸 *उडीद -* 7,800 रुपये प्रति क्विंटल (400 रुपयांची वाढ)
🔸 *भुईमूग -* 7,263 रुपये प्रति क्विंटल (480 रुपयांची वाढ)
🔸 *सूर्यफूल -* 7,721 रुपये प्रति क्विंटल (579 रुपयांची वाढ)
🔸 *कारळे -* 9,537 रुपये प्रति क्विंटल (820 रुपयांची वाढ)
💁🏻♂️ *ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा!*
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पाऊस उघडना, यंदाचा मान्सून दगा देनार का ? जुनमध्ये खंड ?