NSMNY 6’th instalment date ; नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार…
NSMNY 6’th instalment date ; राज्य सरकारने पिएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तसेच पिएम किसान योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी येणार याबाबत उत्सुकता लागली आहे. योजनेचा सहावा हप्ता कधी येणार याबाबत अधिक माहिती पाहुया..
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता पिएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासोबत वितरित होईल अशी माहिती सरकारमधील काही मंत्री देत आहेत. परंतु नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. पिएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते फेब्रुवारी मध्ये मिळण्याची शक्यता आहे.
नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का चेक करा
नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार….
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बॅक खात्याला आधार लिंक तसेच ई-केवायसी असने आवश्यक आहे तसेच शेतकरी पिएम किसान योजनेचा लाभार्थी असावा त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे. तुम्हाला पिएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळेल.
नमो शेतकरी योजनेचे तूमचे स्टेट्स तुम्ही खालील प्रमाणे पाहु शकता…
महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. स्टेट्स पाहण्यासाठी https://nsmny.mahait.org/ या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर बेनीफिशरी स्टेट्स वर क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर टाका. कॅप्चा कोड टाकुन गेट डाटा वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दाखवली जाईल.