NSMNY 6’th instolment date नमोचा पाचवा हप्ता तुम्हाला मिळणार का
NSMNY 6’th instolment date ; पिएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. राज्यातील पिएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो. नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता नवीन सरकार स्थापन झाल्यावर दिला जाईल.
पिएम किसान योजनेचा 18 हप्ता 05/ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील एका कार्यक्रमाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला आहे. लवकरच पिएम किसान योजनेच्या 19 व्या हप्ता वितरित होईल. नमो शेतकरी योजनेच्या 06 व्या हप्त्याचे वितरण नवीन सरकार स्थापन झाल्यावर करण्यात येईल.
नमोचा पुढील हप्ता 2000 रूपये येणार कि 3000 रूपये येणार याबाबत माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही तरी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात घोषणा केल्याप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 9000 रूपये दिले जाणार आहे. वार्षिक 9000 रूपये याप्रमाणे प्रत्येक हप्ता 3000 याप्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.
नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळणार का स्टेटस चेक करा..
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असने , बॅंक खात्याला आधार लिंक असने अतिशय महत्त्वाचे आहे. वरील पैकी काही प्रोसेस तुमच्या पेंटिंग असतील तर लगेच पुर्ण करा कारण त्याशिवाय तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा तसेच पिएम किसान योजनेचा लाभ मिळणार का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करू शकता.