Panjab dakh ; पंजाब डख म्हणतात राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार
Panjab dakh ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दि. 26/मार्च रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार त्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा सतर्कतेचा इशारा दिलाय. नवीन दिलेल्या अंदाजानुसार 31/मार्च पासून पुढे सात दिवस म्हणजेच 07/एप्रिल पर्यंत अवकाळीचे सावट राहणार आहे, पाहुया काय म्हणतात पंजाब डख.
डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार 30/मार्चपासून म्हणजेच गुढीपाडव्याला राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. 31/मार्च ते 04/एप्रिल यादरम्यान राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पावसाची शक्यता आहे. 30/मार्चपासुन राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असुन संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण बिघडणार आहे तरी शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार पुढील नियोजन करावे. (Panjab dakh havaman aandaj live)
हे वाचा – नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय आला कधी मिळणार हप्ता…
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागात अवकाळी पावसा सोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत 30/मार्च ते 07/एप्रिल यादरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
30/मार्चपासुन राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने गहू ,हरभरा, कांदा तसेच इतर काही काढणीला आलेल्या पिकांची काढणी पुर्ण करावी असे डख यांनी सांगितले आहे. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा…