Pikvima 2025 ; एक रुपयाचा पीक विमा बंद ; यंदा पिकविम्याची नवीन योजना, पहा सविस्तर
Pikvima 2025 ; एक रूपयात पिकविमा योजना यंदा बंद करण्यात आलेली आसून आता शेतकऱ्यांनां एक रूपयात पिकविमा भरता येनार नाही. 2025-26 या वर्षासाठीच्या सुधारित पीक विमा योजने राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक रूपयात पिकविमा भरता येनार नाही.. सुधारित पिकविमा योजना कशी आहे आणि शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागनार आहे याबाबत सविस्तर माहिती पाहूयात…
एक रुपयाचा पीक विमा बंद
पूर्वीचा एक रुपयात भरला जाणारा पीक विमा आता बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता त्यांच्या प्रीमियमनुसार ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. यंदा
या योजनेअंतर्गत नऊ कंपन्या पीक विम्यासाठी उपलब्ध असतील, ज्यात भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC ग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि SBI जनरल इन्शुरन्स कंपनी यांचा समावेश आहे.
आधार कार्ड अपडेट करा मोबाईल वरून ; येथे क्लिक करा
Pkivima 2025 ; शेतकऱ्यांना भरावी लागनार एवढी रक्कम
खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% (दीड टक्के) आणि नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेतला जाणार आहे.
उर्वरित प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकार देनार आहे, म्हनजेच विमा भरताना आपल्या क्षेत्रानुसार आणि पिकानुसार शेतकऱ्यांना पैसे भरावे लागनार आहेत.
Pikvima 2025 ; विम्यासाठी नुकसानीचे निकष
ही योजना पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या नैसर्गिक आपत्त्यांसाठी लागू राहील, ज्यात वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, नैसर्गिक आग, पूर, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यांचा समावेश राहनार आहे.
सुधारित पिकविमा योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित असणार आहे.वरील सांगितलेल्या निकषांवर शेतकऱ्यांना पिकविमा भरता येनार आहे आणि वरील अपत्तीमुळे झालेल्या नुकसानालाच विमा मिळनार आहे.
Pikvima 2025 सुधारित पिकविमा योजना ; अर्ज कसा करावा
शेतकरी केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर, सुविधा केंद्र किंवा बँकांच्या माध्यमातून शेतकरी पिकविम्याचा अर्ज करू शकतात.म्हनजेच आधीप्रमानेच पिकविमा भरन्याची प्रक्रिया आसनार आहे.