Pm kisan yojna ; पिएम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र होणार…
Pm kisan yojna ; केंद्र सरकारने 2019 मध्ये पिएम किसान योजना सुरू केली असून या योजनेद्वारे खातेदार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रूपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते वितरित झाले असून फेब्रुवारी मध्ये 19 वा हप्ता वितरित होईल. या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी काहिसी मदत होईल असा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
मोदी सरकारने 2019 मध्ये पिएम किसान योजना सुरू केली तेव्हा या योजनेचा अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत होते. बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी ईकेवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ते येणे बंद होत आहे.
केंद्र सरकारने पिएम किसान च्या अधिकृत पोर्टलवर योजनेतून अपात्र लाभार्थी कोण होणार याबाबत माहिती दिली आहे. खालील नियमात न बसणारे शेतकऱ्यांना आता पिएम किसान योजनेचा लाभ मिळणे बंद होणार आहे.
खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती पिएम किसान योजनेच्या लाभासाठी अपात्र होणार…
1) सर्व संस्थात्मक जमीनधारकाना योजनेचा लाभ मिळणार नाही.
2) संवैधानिक पद धारण करणारे /उ केलेले आजी व माजी व्यक्ती.
3) आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी / माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
4) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी / कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी.
5) सर्व निवृत्तीवेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 10000 रूपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (चतुर्थश्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून)
6) मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
7) नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.
तुम्ही पिएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहे का चेक करा येथे क्लिक करा