Solar pump updates या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार नाहीत.
Solar pump updates शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावी व रात्रीबेरात्री सिंचनासाठी जागे राहावे लागु नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कडून पिएम कुसुम योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी योजना अंतर्गत 90/95% अनुदानावर सोलार पंप दिले जातात. या योजनेत काही शेतकरी दोन्ही योजनेअंतर्गत सोलार पंपाचा लाभ घेतात असे होऊ नये म्हणून केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या नियमावली लागू केल्या आहेत. तरी कोणत्या शेतकऱ्यांना सोलार पंपाचा लाभ मिळणार नाही याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
या शेतकऱ्यांना सोलार पंपाचा लाभ मिळणार नाही
ज्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत किंवा अटल कृषी पंप योजनेअंतर्गत सोलार पंपाचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंपाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी याआधी सोलार पंपाचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांनी पुन्हा सोलार पंपासाठी अर्ज करू नयेत. एकाच शेतकऱ्यांच्या नावावर एकापेक्षा जास्त अर्ज भरले असल्यास त्यांचे ईतर अर्ज रद्द केले जातात.
सोलार पंप योजनेत बोगसगिरी ला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे नियम लागू केले आहे. जर शेतकऱ्यांनी पुर्वी कोणत्याही योजनेअंतर्गत सोलार पंपाचा लाभ घेतला असेल आणि पुन्हा सोलार पंप मिळाला असेल तर त्या शेतकऱ्यांचा सोलार पंप जप्त करून भरलेली रक्कम जप्त करण्यात येईल. केंद्र सरकारने लागू केलेले नवीन नवीन येथे पहा.